Wednesday 25 May 2011

पार्श्वभूमी...

स्मृतीचे पैंजन बांधिले रजोचरणी,
बर्फाळ रस्त्याच्या तीरी साचले मणी,
नील-पुष्पाच्या काजव्यांच्या शिरो-शिरी ,
दिमाखात सजल्या हिम-दवांच्या ओळी...

गगन हे कुठून थाटले सारे ?
मोहनासमोर प्रश्न टाकीला राधेने,
एकांताच्या चौकटीची सारत दारे,
मोहन पुटपुटले, हे  तर आमचे पाहुणे !

काळजाखालच्या अस्थींचा रुतला आवाज,
पोखारता डोंगर आरवली किंरणे,
टेकलेल्या जर्जर वृक्षाच्या मैफिलीत,
एकाच आकांताने बिथरली हरिणे...

आयुष्याच्या धुक्यात थिजले,
भूत-वर्तमानाच्या आठवणीचे चंदन,
सांजेच्या तमाशात आवळले पैंजन,
वगाच्याअंती अटळ आश्रितांचे मंथन...

P.S:  हेरंब, नचिकेत आणि प्रियांका ह्यांच्या साठी....पार्श्वभूमी...
        वेळ : २०:२० , २४/०५/२०११,
        मंगळवार, इचलकरंजी.

1 comment: