Friday 22 April 2011

खेळी

चांदण्यांच्या वामकुक्षित नांदली स्वप्नांची मांदियाळी,
प्रात: कवडसे आले न्हाउनी, काया रजोची उजळूनी गेली !

 रंगला डाव, फिरला फासा, फितूर झाली खेळी,
चांदण्यांच्या अश्वारथी, क्षितीज-सारथी  ठरला बळी !

उन्मत्त सोहम, तरला मदिरेचा थोर उपकार,
पुनवेचा दोष नव्हता, बरहुकूम तो चांदण्यांचा !    

रजनीच्या कवेत अवखळला काजव्यांचा कळप,
नखशिखांत भिनला होता चांदण्यांचा जहर !

सारथी

वाटेच्या त्या पैलतीरी ,छायेच्या गर्तेत कधी,
दिसले का कुणा आसवांच्या रथाचे सारथी ?

चाचपला ढळणारा पदर त्या मळलेल्या हातांनी,
फितूर भवर-याच्या दरबारी दाद काही मिळालीच नाही !

कोणता रंग हा, पर्णाला परी भार सोसावला नाही,
प्राक्तन हे त्याचे का, ढवळले अंतरंग आसमंताचे ?

तरांगासम पळण्याचा बेत त्यांचा फसला,
त्या दोन आसवांच्या था-याने  आणिला पूर पापणीला !

चुकला वाटसरू वाटेच्या त्य वळणावरी,
आभासी पाखरे होती का पाउलखुणा झालेल्या फितुरी ?

Thursday 14 April 2011

प्रवास

उगवतीचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे,
मार्गक्रमण मार्गापेक्षा  स्मरणात  साचले आहे,
तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो,
केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो...