Tuesday 17 May 2011

मी नाही...

तारकांची पेरणी आहे,
ता-यांची रास नाही.
चंद्रासाठी चांदण्या आहे,
चांदण्यांसाठी चंद्र नाही.

संगिनिशी बंधुभाव आहे,
बोचण्यासाठी शिकार नाही.
सावजांचे कळप आहे,
पारध्याची सोय नाही.

ओळखीचा हरेक आहे,
आरोळींची नजर नाही.
दिव्यांचे गुंजन  आहे,
दिवाळीची रागदारी नाही.

स्वप्नांची रजनी आहे,
रजनीची नाराजी नाही.
पंखांची रीघ आहे,
भरारीसाठी गगन नाही.

आमंत्रणाची पाटी आहे,
आर्ततेचे जिव्हाळे नाही.
सोसण्यासाठी एकटा आहे,
व्यासपीठावर एकांत नाही.

ओरड्यासाठी कंठ आहे,
दाटण्यासाठी आसवे नाही.
हाकेइतके अंतर आहे,
धावण्याइतपत त्राण नाही.

होकाराची अपेक्षा आहे,
नकाराची तयारी नाही.
जाणत्यांची वंदता आहे,
जाणण्याचा अंदाज नाही.

मोह-यांची बाज आहे,
खेळाची बाजी नाही.
जीवाचा साज आहे,
जीवनाचे गीत नाही.

आजन्माचे काटे आहे,
बंडासाठी साथ नाही.
पुरासाठी पाणी आहे,
आटण्यासाठी  नदी नाही.

उडण्याची मुभा आहे,
रोखण्यासाठी श्वास नाही.
नाइलाजाचा इलाज आहे,
झुकण्यासाठी मी नाही...

P.S:  ता.१६/०५/२०११
        सोमवार...शाम ८.०५....
   



No comments:

Post a Comment